'विखे पाटील आले, आता गांधींचं काय होणार' हा प्रश्न नगरपासून राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय आहे. सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशानंतर खासदार दिलीप गांधी गट नाराज झाला. गांधी गटाचे म्हणणे होते की, 'सुजय यांनी पक्षप्रवेश करावा. पण तिकीटीसाठी आधी काम दाखवावे, मग तिकीट मागावे.' ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने बाजूला केलेल्या दिलीप गांधी या घडामोडींवर काय म्हणतायत?